महाविद्यालयाच्या वतीने दंत स्वच्छता शिबिर, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण !
तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे संस्थापक कै. डॉ. सुधाकरराव कोरे यांचा प्रथम स्मृतीदिन
नवेपारगाव (जिल्हा कोल्हापूर), २६ ऑगस्ट – तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे संस्थापक आणि ‘महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट’चे उपाध्यक्ष कै. डॉ. सुधाकरराव कोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनाच्या निमित्ताने २३ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या समाधीस्थळी वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. या वेळी तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण, दंत स्वच्छता शिबिर, रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध धार्मिक विधी करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन आणि वृक्षारोपण आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. इतर रुग्णांसाठी १ मास विनामूल्य दंत स्वच्छता आणि वारणा समूहातील कर्मचार्यांसाठी ३ मास विनामूल्य दंत स्वच्छता शिबिर असणार आहे. या वेळी कै. डॉ. सुधाकरराव कोरे यांच्या जीवनावरील चित्रफित दाखवण्यात आली.
या वेळी कै. डॉ. सुधाकरराव कोरे यांच्या पत्नी पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे, मुलगी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे, नातू डॉ. कौशल कोठावळे, मुलगा डॉ. शैलेश कोरे, सून सौ. रूपाली कोरे, विश्वेश कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, डॉ. विजय कोरे, वारणा बँकेचे माजी अध्यक्ष प्रमोद कोरे, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, शिवाजीराव जंगम, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष कुलकर्णी यांच्यासह तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय आणि महात्मा गांधी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.