भारतातील साम्यवादी चीनचे हस्तक ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो; परंतु शत्रूचा मित्र हाही आपला शत्रूच असतो. भारतातील साम्यवादी देशाच्या शत्रूशी म्हणजेच चीनशी मैत्री करतात. त्यामुळे ते एक प्रकारे भारताचे शत्रू आणि चीनचे हस्तक आहेत. ते भारताची संस्कृती, परंपरा आणि हिंदुत्व यांना विरोध करतात अन् केवळ साम्यवादी विचारसरणीशी निष्ठा दाखवतात. चीनशी लागेबांधे असणारे साम्यवादी हे भारताचे नागरिक म्हणून अल्प, तर चीनचे गुप्तहेर म्हणून अधिक भूमिका निभावतात. भारतीय परराष्ट्र विभागाचे निवृत्त सचिव विजय गोखले यांनीही त्यांच्या पुस्तकात ‘चिनी साम्यवादी पक्ष भारतातील साम्यवादी पक्षांशी घनिष्ठ संबंध ठेवून त्याचा भारतीय धोरणांच्या विरोधात उपयोग करतात’, असा आरोप केला आहे.