सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू, तर ४६ नवीन रुग्ण
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनाचे ४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३४३ झाली आहे. २६ ऑगस्ट या दिवशी ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सद्य:स्थितीत १ सहस्र ५६२ रुग्णांवर उपचार चालू आहेत.
आतापर्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) मिळून एकूण ४ लाख ७० सहस्र ५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.