१२ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांना ऑक्टोबरपासून मिळणार लस !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देशातील १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. सर्वप्रथम ही लस गंभीर आजार असणार्‍या मुलांना दिली जाईल. ‘झायडस कॅडिला’ या आस्थापनाची ही लस मुलांना देण्यात येणार आहे.