‘मंगलम् कापूर’च्या विज्ञापनाद्वारे प्रभु श्रीरामाचा अवमान !
|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुंबई – ‘मंगलम् कापूर’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामांचे अश्लाघ्य स्वरूपात विडंबन करण्यात आले आहे. या माध्यमातून श्रीरामांचे मानवीकरण करण्यात आले असून यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. आस्थापनाने हे विज्ञापन मागे घेऊन हिंदूंची क्षमा मागावी, अशी हिंदुत्वनिष्ठांकडून आग्रही मागणी करण्यात येत आहे.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
हे विज्ञापन रियान मेनडोन्का नावाच्या व्यक्तीने ‘यू ट्यूब’वर अपलोड केले आहे. या विज्ञापनामध्ये श्रीरामाच्या वेशातील एका तरुणाकडे ‘अॅन्ड्रॉईड’ भ्रमणभाष दाखवण्यात आला असून तरुण ‘सेल्फी’ घेण्यासाठी भ्रमणभाष स्वत:समोर पकडतो. त्याला भ्रमणभाषमध्ये त्याच्या आईचे छायाचित्र दिसते. तेव्हा अचानक त्याला आईने आपल्याला कापूर आणायला सांगितल्याचे आठवते. नंतर श्रीरामाच्या वेशातील तरुण एका दुकानात जाऊन कापूर मागतो. तेव्हा दुकानदार पूजा करत असतो. दुकानदाराचा नोकर त्याला सर्वसाधारण कापूर आणून देतो. समोर ‘श्रीराम कापूर मागत आहे’, हे दुकानदाराला लक्षात आल्याचे दाखवत दुकानदार नोकराने दिलेला कापूर फेकून देतो आणि तिजोरीतून ‘मंगलम् कापूर’ काढून श्रीरामाच्या वेशातील तरुणाच्या हातात देतो अन् नमस्कार करतो.