उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे निराधार महिलेला करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून साहाय्य !  

निराधार महिला विमल देसाई (डावीकडे) यांना धान्य आणि अन्य साहित्य देतांना राजू यादव (उजवीकडे), तसेच अन्य शिवसैनिक

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), २५ ऑगस्ट (वार्ता.) – उंचगाव येथील निराधार महिला विमल देसाई यांचा निराधार असल्याचा अपलाभ उठवत एका महिलेने देसाई यांची २ लाख रुपयांची रक्कम व्याजाचे आमीष दाखवून हडप केली. ही घटना करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांना समजताच त्यांनी देसाई यांची भेट घेऊन त्यांना २ मासाचे धान्य आणि अन्य साहित्य दिले. देसाई यांना फसवणूक झालेली रक्कम परत मिळेपर्यंत करवीर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे श्री. राजू यादव यांनी सांगितले. या वेळी सर्वश्री दीपक रेडेकर, बाळासो नलवडे, केरबा माने, बंडा पाटील, अजित पाटील आदी उपस्थित होते. (निराधार महिलेला साहाय्य करणारे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांचे अभिनंदन ! – संपादक)