पुष्कळ शांत आणि स्थिर असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मधुकर कोहीनकर (वय ८२ वर्षे) !

श्री. मधुकर कोहीनकर

१. ‘श्री. कोहीनकर हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. काही वर्षे ते मुख्याध्यापक म्हणूनही कार्यरत होते. ते प्रत्येक काम नीटनेटकेपणाने आणि परिपूर्ण करतात.

२. ते प्रतिदिन ठरलेली कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करतात.

३. काटकसरीपणा

श्री. कोहीनकर मोजकेच कपडे वापरतात. शक्य होतील ती सर्व कामे ते स्वतः करतात. जवळच्या अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी बस आणि रिक्शा यांचा वापर टाळतात. ते अनावश्यक व्यय करत नाहीत. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते प्रतिदिन ३ – ४ कि.मी. चालतात. त्यामध्ये कधीही खंड पडत नाही.

४. मितभाषी

ते कुणाशीही विनाकारण बोलत नाहीत. कुणाचेही मन दुखावेल, असे बोलत नाहीत किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.

५. ते सतत आनंदी आणि शांत असतात.

६. पत्नीला घरकामांत साहाय्य करणे

मला आध्यात्मिक त्रास असल्याने मी सतत आजारी असते. त्यामुळे घरातील प्रत्येक कामात ते मला साहाय्य करतात. साहाय्य करण्यासाठी त्यांना सांगावे लागत नाही. ‘मंडईतून भाजी आणणे, किराणा माल आणणे, भांडी लावणे, कपड्यांच्या घड्या करणे, पाणी भरणे, देवपूजा करणे’, ही कामे ते प्रतिदिन करतात.

७. साधकांना साहाय्य करणे

पूर्वी आमच्या घरी सत्संग असायचे. त्यामुळे घरी साधकांचे नेहमी येणे-जाणे असायचे. श्री. कोहीनकर सर्व साधकांशी शांतपणे बोलायचे आणि साधकांना काही साहाय्य लागल्यास करायचे.

८. व्यष्टी साधना

ते १५ वर्षांपासून नामस्मरण करतात. प्रत्येक कृती करण्यापूर्वी ते प्रार्थना करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. ते परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून त्यांच्या चरणांचे स्मरण करतात.’

– सौ. मालती मधुकर कोहीनकर (पत्नी), राजगुरुनगर, पुणे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

९. ‘काका पुष्कळ शांत आणि स्थिर जाणवतात. ते साधकांशी आदराने आणि प्रेमाने बोलतात.

– कु. वैभवी भोवर, पुणे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

१०. जाणवलेला पालट

‘पूर्वी ते पुष्कळ चिडचिड करायचे. आता त्यांचा स्वभाव शांत झाला आहे.’ – सौ. मालती मधुकर कोहीनकर , राजगुरुनगर, पुणे. (ऑगस्ट २०२०)