संभाजीनगर येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणार !

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार !

संभाजीनगर – कोरोनाचा संसर्ग आणि दळणवळण बंदी यांमुळे अनेकांनी रोजगार गमावला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत अनेकांनी स्वतःच्या कुटुंबांतील प्रिय व्यक्तींना गमावले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि इतर शुल्क माफ करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे, तसेच विद्यापीठ कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या अनाथ पाल्यांचे पालकत्व स्वीकारणार आहे.

विद्यापिठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांच्या शुल्कामध्ये ५० टक्के शुल्क माफी, तसेच न झालेला महोत्सव आणि कार्यक्रम यांचे शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. या निर्णयामुळे ७ कोटी रुपयांहून अधिक हानी विद्यापिठास सहन करावी लागणार आहे.