पिंपरी (पुणे) येथील बंद पडलेल्या जलवाहिनी प्रकल्पावर १३ कोटी रुपयांचा व्यय !

बंद पडलेल्या जलवाहिनी प्रकल्पावर कोट्यवधी रुपये व्यय करणारे प्रशासन काय कामाचे ? सरकारने यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! – संपादक

पिंपरी (पुणे), २५ ऑगस्ट – मावळातील पवना धरण ते निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम ९ ऑगस्ट २०११ पासून म्हणजे गेली १० वर्षे बंद आहे. तरीही या प्रकल्पावर वेगवेगळ्या कारणांनी अखंड व्यय करणे चालूच आहे. पालिकेने आतापर्यंत ठेकेदार आस्थापनाला १४५ कोटी रुपये दिले आहेत. या प्रकल्पातील साहित्य ठेवण्याच्या जागेचे भाडे म्हणून १३ कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे.

या प्रकल्पाचे काम केवळ १२ प्रतिशत पूर्ण झाले आहे. काम चालू असतांना खासगी जागेत पाईप ठेवण्यात आले आहेत. गोदामात इतर साहित्य आहे. यावर देखरेख म्हणून १६ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. महापालिकेने आतापर्यंत ठेकेदारास जवळपास ५९ कोटी ६६ लाख रुपये आगाऊ दिल्याचेही समोर येत आहे.