केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘हाय अलर्ट’ घोषित !
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कायदा हातात घेणार्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.