भारतीय नौदलाच्या ९१ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन !

भारतीय नौदलाच्या १६ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी १०५ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले

पुणे – लोणावळा येथील आय.एन्.एस्. शिवाजी सागरी अभियांत्रिकीच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत ९१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. भारतीय नौदलाच्या १६ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी १०५ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. चीफ ऑफ मटेरियल व्हाईस ॲडमिरल संदीप नैथानी यांनी संचलन सोहळ्याची पहाणी करून अधिकारी-कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन केले.