जन्मठेप भोगत असलेले सज्जन कुमार यांना जामिनासाठी आरोग्याचा अहवाल सादर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

वर्ष १९८४ च्या शीख दंगलीचे प्रकरण

जन्मठेप भोगत असलेल्या दोषीला जामीन कशासाठी ? उलट सहस्रो नागरिकांची हत्या करणार्‍याला तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती ! – संपादक

काँग्रेसचे नेते सज्जन कुमार

नवी देहली – दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये वर्ष १९८४ मध्ये झालेल्या शिखांच्या हत्याकांडाच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांनी बिघडलेल्या आरोग्याचे कारण सांगत अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी त्यांच्या आरोग्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी १३ मे या दिवशीही न्यायालयाने याच आधारावर कुमार यांनी मागितलेला अंतरिम जामीन नाकारला होता.