सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच !
प्रारूप प्रभाग रचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
सातारा, २४ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून काही दिवसांत निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. नवीन नियमानुसार नगरपालिकांच्या निवडणुका ‘एक प्रभाग एक उमेदवार’ या पद्धतीनुसार होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकार्यांना प्रारूप प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. २३ ऑगस्टपासून जिल्ह्यातील पालिका सीमेतील प्रभाग निश्चिती प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पालिकांची निवडणूक मागील वेळी बहुसदस्यीय पद्धतीनुसार झाली होती. अपेक्षेनुसार राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबरमध्ये कालमर्यादा संपणार्या नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या सीमेतील प्रभाग निश्चितीचा प्रारूप आराखडा सिद्ध करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. नव्याने होणार्या प्रभाग रचनेसाठी वर्ष २०११ मधील लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असून आयोगाच्या आदेशानुसार लोकसंख्या, अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या आणि प्रगण गटाचे नकाशे यांनुसार उपलब्ध माहिती ग्राह्य धरावी लागणार आहे.