कामावर असतांना दाढी ठेवण्याची मागणी करणार्या मुसलमान पोलिसाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पोलीसदलाने दाढी ठेवण्यावर घातलेल्या बंदीच्या विरोधात महंमद फरमान या पोलीस शिपायाने प्रविष्ट केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले, ‘पोलिसांची प्रतिमा धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. अशी प्रतिमा राष्ट्रीय एकता अधिक भक्कम करते.’ पोलीसदलाने वर्ष २०२० मध्ये ‘पोलिसांनी दाढी ठेवू नये’, अशा आशयाचा कार्यालयीन आदेश काढला होता; मात्र फरमान यांनी त्याचे पालन न केल्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. फरमान त्यांचे केलेले निलंबन आणि प्रविष्ट करण्यात आलेले आरोपपत्र याला विरोध करणारी आणखी एक याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने ती याचिकाही फेटाळून लावली.
#UttarPradesh : पुलिस बल में दाढ़ी रखने पर रोक के खिलाफ याचिका खारिज, #HighCourt ने यह कहाhttps://t.co/RZEsUBo60m
— Hindustan (@Live_Hindustan) August 23, 2021
फरमान यांनी याचिकेत म्हटले होते की, राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार त्यांनी दाढी ठेवली होती. यासाठी अनुमती मिळावी; म्हणून पोलीस खात्याला अर्जही केला होता जो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे फरमान यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.