‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ (एम्.पी.एस्.सी.) परीक्षार्थींसाठी आज ऑनलाईन मार्गदर्शन
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम्.पी.एस्.सी.) परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या या संकल्पनेतून चालू करण्यात आलेल्या ‘प्रेरणा’ उपक्रमाच्या अंतर्गत २४ ऑगस्टला सायंकाळी ५ ते ६ या वेळेत फेसबूक लाईव्हद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492, या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे.
या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी तथा देवगडचे उपविभागीय अधिकारी सुधीर सुभाष पाटील, तहसीलदार तथा परिचलन अधिकारी सुधीर बाजीराव पाटील ‘एम्.पी.एस्.सी.’ परीक्षेची सिद्धता कशी करावी ? आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे ? येणार्या अडचणींवर मार्ग कसा काढावा ?’ यांसह विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, शंका यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
‘प्रेरणा’ उपक्रमाच्या अंतर्गत १७ ऑगस्टला ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आले होते.