राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.८.२०२१
प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
ही आहे महाविद्यालयांची लज्जास्पद स्थिती !
‘सनातनची साधिका कु. प्रतीक्षा लोहार लहानपणापासूनच बुद्धीमान होती. तिला परीक्षेत ८० टक्के गुण मिळायचे; पण माध्यमिक शाळेत असतांना महाविद्यालयीन मुलांचे ऐहिक जीवन पाहून तिने ‘पुढे शिक्षण घ्यायचे नाही’, असे ठरवले.’
– सौ. रेखा लोहार (आई), खडकेवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर.
जोपर्यंत हिंदूंमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत होत नाही, तोपर्यंत शस्त्रांचे मूल्य शून्य !
‘स्वदेशी विमानवाहू नौका ‘विक्रांत’ची समुद्रात चाचणी चालू आहे. आज भारत आपले लढाऊ विमान विकसित करत आहे. पाणबुडी बनवत आहे.’
– पंतप्रधान नरेंद्र मोदी