नागपूर येथील ‘गंगा-जमुना वस्ती’त आंदोलक आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की !
अवैध धंद्यांमुळे ‘गंगा-जमुना वस्ती’ बंद केल्याचे प्रकरण
नागपूर – येथील गंगा-जमुना वस्तीत अवैध धंदे चालत असल्याने याच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर ही वस्ती पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती; मात्र २२ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विदर्भ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वाखाली ही वस्ती खुली करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने आंदोलक आणि विरोधी गट यांच्यात धक्काबुक्की होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली.
‘गंगा-जमुना वस्ती’त अवैध धंदे बंद करण्याच्या पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून समर्थन केले जात आहे, तर ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वाखाली ही वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.