भारतीय रेल्वेला १ रुपयामधून ४८ पैसे तोटा ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री
जालना – ‘भारतीय रेल्वेला एक रुपयामागे ४८ पैसे इतका तोटा सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेल्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे विभागाला दिली आहे. त्यामुळे रेल्वेचा कारभार रूळावर आला आहे’, असे प्रतिपादन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले. २२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.