राज्यातील ३ सहस्र २६७ धरणांत ११ टक्के अल्प पाणी !
नागपूर – महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला असला, तरी अनेक धरणे अजून पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. राज्यात ३ सहस्र २६७ धरणे असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही ११ टक्के पाण्याची तूट कायम आहे. राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला; मात्र अजूनही धरणांनी गेल्या वर्षीची जलसाठ्याची पातळी गाठलेली नाही. राज्यात मोठी, मध्यम आणि लघु मिळून एकूण ३ सहस्र २६७ धरणे आहेत. २१ ऑगस्ट २०२० या दिवशी या धरणांतील जलसाठा ६९.९१ टक्के होता; मात्र २१ ऑगस्ट २०२१ दिवशी हा जलसाठा ५८.५३ टक्के होता. त्यामुळे ११.३८ टक्क्यांची तूट अजूनही आहे.