एन्.आय.ए.कडून खालिस्तानी आतंकवाद्याला अटक

खलिस्तानी आतंकवादी भारताच्या सुरक्षेला धोकादायक असून त्यांचा नायनाट आवश्यक ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – स्फोटकांनी भरलेले डबे बाळगल्याच्या प्रकरणी गुरुमुख सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यात आली. गुरुमुख सिंह हा फुटीरतावादी खलिस्तानी चळवळ चालू करणारा आतंकवादी जरनैलसिंह बिंद्रनवाले याचा भाचा, तर अकाल तख्तचा माजी नेता जसबीरसिंह रोडे याचा मुलगा आहे.

देहली येथे २६ जानेवारी या दिवशी शेतकरी आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाला. त्यात जसबीरसिंह रोडे याचा हात होता. एन्.आय.ए.ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) नुकतीच जालंधरमधील एका गावात रहाणार्‍या जसबीरसिंह रोडे याच्या घरावर धाड घातली होती. या वेळी स्फोटके जप्त करण्यात आली, तसेच गुरुमुख सिंह याला अटक करण्यात आली. गुरुमुख सिंह याला पाकिस्तानमध्ये रहाणार्‍या त्याचा काका लखबीर सिंह याच्याकडून स्फोटके पुरवली जात होती. लखबीर सिंह हा पाकिस्तानमध्ये रहात असून तो खालिस्तानी आतंकवादी आहे.