इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांकडून २ अल्पवयीन हिंदु मुलींवर आक्रमण
धर्मांधांनी पीडितांच्या साहाय्यासाठी आलेल्या पोलिसांना पिटाळून लावले
आता आपले रक्षण कोणताही पक्ष, सरकार, समाज किंवा पोलीस करू शकत नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित झाले पाहिजे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वत:चे रक्षण स्वत:च केले पाहिजे ! – संपादक
इंदूर (मध्यप्रदेश) – धर्मांध युवकांनी दोन अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढून त्यांच्यावर काचेच्या बाटल्यांद्वारे जीवघेणे आक्रमण केल्याची घटना येथील बंबई बाजार भागामध्ये घडली. या वेळी पीडितांना वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही धर्मांधांनी पिटाळून लावले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांच्या विरोधात प्रकरण नोंद केले असून पुढील अन्वेषण चालू आहे.
१. येथे एक व्यावसायिक त्यांच्या भाचींसमवेत ज्यूस पित बसले असतांना तेथे दोन धर्मांध युवकांनी येऊन अल्पवयीन मुलींची छेड काढली. याचा त्यांनी प्रतिकार केला. तेव्हा धर्मांधांनी काचेच्या बाटलींनी मुली आणि त्यांच्या कुटुंबियांवर आक्रमण केले. यात त्यांच्यासह त्यांचे कुटुंब घायाळ झाले. या वेळी पीडितांना वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही धर्मांधांनी पिटाळून लावले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. ही घटना १३ ऑगस्टची आहे; परंतु याविषयीचे चलचित्र समाज माध्यमांमधून प्रसारित झाल्यावर ती समोर आली आहे.
२. पीडित मुली वाल्मीकि समाजाच्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार नाही, तोपर्यंत बंबई बाजार भागाची स्वच्छता करण्यात येणार नाही, अशी चेतावणी वाल्मीकि समाजाच्या लोकांनी दिली आहे. (विशिष्ट समाजाच्या लोकांनी जातीचा विचार सोडून हिंदू म्हणून संघटित झाल्यास त्यांना अशा प्रकारे आक्रमण सोसण्याची वेळ येणार नाही ! – संपादक) मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी ८ जणांच्या विरोधात एस्सी-एस्टी कायदा, पोक्सो आणि अन्य आयपीसी कलमांतर्गत प्रकरण नोंदवले आहे.