(म्हणे) ‘अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवले !’
तमिळनाडूतील मौलाना शमसुद्दीन कासिमी यांच्याकडून तालिबान्यांचे उदात्तीकरण
चेन्नई – अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर दुसर्यांदा नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे सर्व मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, असे विधान तमिळनाडूतील मौलाना (इस्लामी अभ्यासक) शमसुद्दीन कासिमी यांनी केले आहे. कासिमी यांची एक ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली आहे. त्यात मौलाना कासिमी असे वक्तव्य करतांना दिसत आहेत. तालिबान्यांना हिंसक दाखवणार्या प्रसारमाध्यमांना कासिमी यांनी ‘वेश्यावृत्तीची प्रसारमाध्यमे’ असे म्हटले आहे.