हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात साधना म्हणून सहभागी व्हा ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत संघटक, हिंदु जनजागृती समिती
‘तरुण हिंदु’ संघटनेच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र का आणि कसे ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
धनबाद (झारखंड) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपल्याला सकारात्मक राहून साधना म्हणून सहभागी होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत संघटक श्री. शंभू गवारे यांनी केले. येथील ‘तरुण हिंदु’ या संघटनेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र का आणि कसे ?’, या विषयावर एका ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये श्री. गवारे यांनी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ‘तरुण हिंदु’चे संस्थापक डॉ. एन्.एम्. दास यांनी समितीला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला बंगाल, झारखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून विविध संघटनांचे प्रतिनिधी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
या वेळी श्री. गवारे यांनी ‘हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ?, धर्म आणि पंथ यांमधील भेद, भारताला असंवैधानिक पद्धतीने धर्मनिरपेक्ष कसे करण्यात आले ?’, आदी सूत्रांवरही विचार मांडले.
क्षणचित्र : या कार्यक्रमामुळे ‘हिंदु राष्ट्राविषयी मनामध्ये सकारात्मकता निर्माण झाली’, असे उपस्थितांनी सांगितले. ‘अशा प्रकारची माहिती नियमितपणे मिळावी’, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.