अफगानिस्तानमध्ये ७४ लाख कोटी रुपयांची खनिज संपत्ती !
चीन या साधन संपत्तीवर तालिबानच्या साहाय्याने डल्ला मारणार, हे निश्चित ! – संपादक
नवी देहली – अफगाणिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असून या देशात १ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे ७४ लाख कोटी रुपयांची संपत्ती दडली आहे, अशी माहिती पुढे आली आहे. भूगर्भातील सर्वेक्षणानुसार अफगाणिस्तानमध्ये लिथियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यापासून ‘रिचार्जेबल’ बॅटर्यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे त्याला जगभरात प्रचंड मागणी आहे. तज्ञांच्या मते अफगाणिस्तानमध्ये सोने, तांबे, लोह कोबाल्ट यांचेही साठे आहेत. येथील साधन संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर झाल्यास अफगाणिस्तान हा लोह आणि तांबे यांची निर्यात करणारा जगातील सर्वांत मोठा देश होऊ शकतो. त्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होऊ शकतो.