‘आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड योग’ यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पार्थिव महागणपतिपूजन कार्यशाळेचे आयोजन
सावंतवाडी – श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड योग’ यांच्या वतीने पार्थिव महागणपतिपूजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते ११.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत पार्थिव श्री गणेशाचे पूजन कसे करावे, हे शिकवले जाणार आहे. या अंतर्गत पार्थिव गणपति पूजनाचे महत्त्व, प्रात्यक्षिकासह गणपतिपूजनाचा संपूर्ण विधी, गणपतिस्तोत्र पठण आणि ५ दिवसांचे संकल्पयुक्त पंचांग शिकवले जाणार आहे. कार्यशाळा ‘ऑनलाईन गूगल मीट’वर घेतली जाणार आहे. प्रथम नावनोंदणी करणार्या ५० विद्यार्थ्यांनाच कार्यशाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रबंधक, ‘आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड योग’ यांच्याशी ९४०५५७५६८० किंवा ९२८४३४५६२५ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.