फोंडाघाट येथे लाकडाची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद
कणकवली – तालुक्यातील फोंडाघाट येथे लाकडाची अवैध वाहतूक वनविभागाच्या गस्ती पथकाने रोखली. या वेळी ट्रकसह ९ लाख ५० सहस्र रुपयांचे साहित्य वनविभागाच्या पथकाने कह्यात घेतले. या प्रकरणी कोल्हापूर येथील राजेश रमेश राणे आणि अजय धोंडीराम कोंडवळ या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पथकाने ही कारवाई केली.