धर्मांधांचे तुष्टीकरण करून धार्मिक दंगल भडकावणारे पोलीस अधिकारी आणि धर्मांधांवर कारवाई करून दंगल शमवणारे पोलीस अधिकारी !
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीसपोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
१. दंगलीच्या वेळी हिंदु वस्त्यांच्या ठिकाणी अधिक बंदोबस्त ठेवणारे आणि अल्पसंख्यांकांना मात्र मोकळीक देणारे पोलीस !
‘वर्ष १९८७-८८ मध्ये एका शहरात हिंदु-अल्पसंख्यांक यांच्यात दंगल झाली होती. दंगलीचे पडसाद शहरात १० दिवस उमटत होते. अशा दंगलीच्या वेळी राजकीय पक्षांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे प्रतिदिन सरकारला अहवाल सादर करावे लागतात. ही एक प्रकारची डोकेदुखीच असते. अशा सर्व प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी धर्मांधांना ‘सॉफ्ट कॉर्नर’ देतात. पोलिसांविरुद्ध अल्पसंख्यांक कुठेही आवाज उठवणार नाहीत, याची पोलीस अधिकाधिक काळजी घेत असतात. दंगलीच्या वेळी पोलीस अधीक्षकांनी हिंदु वस्तीवर अधिक पोलीस आणि अल्पसंख्यांकांच्या वस्तीच्या ठिकाणी मात्र विरळ बंदोबस्त ठेवला.
२. धर्मांधांकडून हिंदु वस्त्यांवर आक्रमण केले जाणे आणि पोलीस आदेशाअभावी बघ्याची भूमिका घेत असल्याने दंगलीमध्ये हिंदूच अधिक संख्येत घायाळ होणे
अल्पसंख्यांकांना मोकळीक मिळाल्यामुळे ते रात्रीच्या वेळी हिंदु वस्त्यांवर आक्रमण करत हिंदूंना मारहाण करून पळून जात. काही वेळा पोलिसांनाही धर्मांधांकडून मारहाण होत असे; पण योग्य आदेश नसल्याने त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असे. साहजिकच धर्मांधांपेक्षा हिंदूंचे घायाळ होण्याचे प्रमाण पुष्कळ होते. या वेळी पोलिसांना दिवसरात्र कर्तव्य बजावावे लागत असल्याने ते त्रस्त झाले होते. दंगल आटोक्यात येत नव्हती. त्याच वेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे तात्काळ स्थानांतर करण्यात आले.
३. नवीन पोलीस अधीक्षकांना पोलीस बंदोबस्त चुकीच्या पद्धतीने ठेवल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दंगलखोरांना गोळी घालण्याचे आदेश देणे आणि त्यांच्या स्पष्ट कृतीमुळे बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी अन् पोलीस यांना धीर येणे
नवीन आलेल्या पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यावर प्रथम दंगलीचा वृत्तांत जाणून घेतला आणि सर्वाधिक घायाळ असलेल्यांचा अभ्यास केला. त्यांनी शहरातील दंगलग्रस्त भागाची पहाणी केली, तेव्हा त्यांना शहरात चुकीच्या पद्धतीने बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी हिंदु वस्तीत न्यूनतम बंदोबस्त ठेवून अधिक बंदोबस्त अल्पसंख्यांकांच्या वस्तीत ठेवला. त्यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले. या वेळी त्यांनी ‘शासनाला जे काही उत्तर द्यावे लागेल, ते मी देईन’, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी आणि पोलीस यांना धीर आला. ही बातमी लगेच शहरात पसरली.
४. पोलिसांनी गल्ल्यांमध्ये घुसून लाठीमार केल्यावर दंगल शांत होणे आणि पोलिसांना आदेश मिळणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येणे
त्याच रात्री पोलिसांनी एका गल्लीमध्ये घुसून लाठीमार केला. परिणामी दुसर्या दिवशी लगेच दंगल शांत झाली. त्या अधिकार्याचा पुढील कार्यकाळ शांततेत गेला. अधिकार असले, तरी ते वापरण्याचे धारिष्ट्य असावे लागते. पूर्वीच्या पोलीस अधीक्षकांना दंगल कुणामुळे घडत आहे, याची कल्पना होती. तरीही त्यांनी केवळ राजकीय भयापोटी अल्पसंख्यांकांना मोकळे रान दिले होते. पोलीस दंगल आटोक्यात आणू शकतात; परंतु त्यांना आदेश देण्याची आवश्यकता असते. अन्यथा त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागते आणि मारही खावा लागतो.’
– एक पोलीस अधिकारी
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती ! पोलीस-प्रशासन यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधितांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ ई-मेल : socialchange.n@gmail.com |