वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय
श्री. नवनीत कुमार, बिहार – कार्यक्रम अतिशय आवडला. स्वरक्षण कसे करावे ? आणि समाजात वाढलेले अत्याचार कसे थांबवावेत ? याविषयीची प्रात्यक्षिके पुष्कळ आवडली.
प्रियंका राय, राजस्थान – गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या वेळी मला प्रवास करावा लागला. एरव्ही प्रवासामध्ये मला पुष्कळ त्रास होतो; परंतु या कार्यक्रमाचे चैतन्य एवढे होते की, मला प्रवासाचा थोडाही त्रास झाला नाही. ‘मी परात्प गुरुदेव डॉ. आठवले यांच्या समोरच बसले आहे’, असे वाटत होते.
पूनम राय, गया, बिहार – मला प्रथमच गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘ऑनलाईन’ सहभागी होण्याची संधी मिळाली. गुरुपूजनाच्या वेळी माझ्याकडूनही मानसपूजा झाली. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली. कार्यक्रमाच्या वेळी गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘ते मलाच शिकवत आहेत’, असे वाटत होते. आपत्काळात सिद्धता कशी करावी ? याविषयी पुष्कळ शिकायला मिळाले.
श्री. अजय विक्रम सिंह, सुलतानपूर, उत्तरप्रदेश – आजच्या कार्यक्रमामध्ये गुरु आपल्या समवेत जन्मजन्मांतरापासून आहेत, हे समजले. त्यामुळे पुष्कळ भावजागृती झाली. आमच्यासाठी ते किती त्रास सहन करतात, हे मला कधी समजलेच नाही. आज कळले की, ते साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत.
श्री. कुलदीप कुमार – ही संस्था (सनातन संस्था) हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी सर्वाेच्च योगदान देईल.
श्री. सुधीर वर्मा – भारताचे प्रत्येक गाव, शहर, मंदिर आणि विद्यालये येथे असा गुरुपौर्णिमा महोत्सव झाला पाहिजे.
डॉ. राजेंद्र गावस्कर, सिंधुदुर्ग – साधकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर येणार्या शंकांचे निरसन करून आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणार्या सर्वशक्तीमान गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत.
रमा दोराईस्वामी – माझी ८२ वर्षांची आई अचानक एकटी राहू लागली आहे आणि ती आम्हा मुलींपैकी कुणाच्याही संपर्कात नाही. त्यामुळे आम्हाला काळजी वाटत होती; पण परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर मला आता सकारात्मक वाटत आहे.