‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या वतीने करण्यात आलेला अध्यात्मप्रसार !
१. ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘रेकी आणि प्राणिक हिलिंग (उपचार)’ या कार्यक्रमाचे प्रसारण
एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘रेकी आणि प्राणिक हिलिंग (उपचार)’ या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी या विषयाचे सादरीकरण केले.
२. किशोरवयीन मुलांसाठी ‘चांगली स्पंदने प्रवाहित करूया (लेटस् स्प्रेड गूड व्हायब्रेशन्स्)!’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन !
एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने किशोरवयीन मुलांसाठी ‘चांगली स्पंदने प्रवाहित करूया (लेटस् स्प्रेड गूड व्हायब्रेशन्स्) !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग घेण्यात आला. त्यात सत्त्व, रज आणि तम यांविषयी माहिती देण्यात आली, तसेच ‘सात्त्विक कपडे परिधान करणे, सात्त्विक पेय आणि सात्त्विक संगीत’, हे विषय घेण्यात आले. १८८ जणांनी या सत्संगाचा लाभ घेतला. ‘एस्.एस्.आर्.एफ्. यूट्यूब’वर सत्संगाचे चलचित्र (व्हिडिओ) ठेवण्यात आले. ते ९८० जिज्ञासूंनी पाहिले. ‘एस्.एस्.आर्.एफ्. फेसबूक’वरही या चलचित्राला (‘व्हिडिओ’ला) चांगला प्रतिसाद मिळाला.
३. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
‘याद्वारे हिंदी, इंग्रजी, रशियन, इंडोनेशियन, सर्बाे-क्रोएशियन, स्पॅनिश आणि फ्रेंच या ७ भाषांतील वाचकांशी संवाद साधण्यात आला.’
– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (ऑगस्ट २०२१)