बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीसाठी आनंद दवे यांच्यासहित ब्राह्मण महासंघाच्या ३० पदाधिकार्यांवर गुन्हे नोंद !
पोलिसांनी अनुमती नाकारल्याचे कळवले नसल्याने आम्ही मिरवणूक काढली ! – आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ
पुणे, २१ ऑगस्ट – ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात १८ ऑगस्ट या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३२१ वी जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी लाल महाल ते शनिवारवाडा अशी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमुळे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासहित ब्राह्मण महासंघाच्या ३० पदाधिकार्यांवर विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर ‘आम्ही पोलीस ठाण्यात अनुमती मागितली होती; पण आम्हाला अनुमती नाकारल्याचे पोलिसांनी कळवले नव्हते, त्यामुळे आम्ही मिरवणूक काढली’, असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.