खासदार संभाजीराजे यांना अटक करण्याची अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मागणी !
मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्याचे प्रकरण
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नांदेड येथे मूक आंदोलन केल्याप्रकरणी खासदार संभाजीराजे यांना अटक करावी, अशी मागणी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक शेवाळे यांच्याकडे केली आहे. मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संभाजीराजे यांना अटक करावी, असे अधिवक्ता सदावर्ते यांनी म्हटले आहे.