हिरे व्यापारी नीरव मोदी यांची मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेला मिळणार !
मुंबई – हिरे व्यापारी नीरव मोदी यांची अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतलेली ४४० कोटी रुपयांची मालमत्ता पंजाब नॅशनल अधिकोषाला (बँकेला) परत करण्यास विशेष न्यायालयाने अनुमती दिली आहे. नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांच्यावर वरील अधिकोषाकडून फसवणुकीने पत सुविधा मिळवून १४ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी यांच्या दोन आस्थापनांना दिलेल्या पत सुविधांच्या विरोधात अधिकोषाकडे गहाण ठेवलेल्या मालमत्ता परत करण्याच्या मागणीसाठी अधिकोषाने जुलै २०२१ मध्ये अर्ज केला होता.