साधिकेला सुचलेला ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ या शब्दाचा भावार्थ !
दै – दैवी ‘सनातन प्रभात’ आहे ईश्वराचा दूत ।
नि – नित्य नियमाने जातो प्रतिदिन घराघरात ।
क – कधीच न घेता सुटी, जनजागृती करतो ‘सनातन प्रभात’ ।
स – सतत तेवत रहाणारी आध्यात्मिक ज्योत, म्हणजे ‘सनातन प्रभात’ ।
ना – नाही कशातही उणे तो ‘सनातन प्रभात’ ।
त – ‘तरणार आम्ही आपत्काळात, सज्ज होऊ हिंदु राष्ट्र येण्यास’, हा संदेश देतो ‘सनातन प्रभात’ ।
न – ‘नसे आम्हाला कशाचीही आस, करू धर्माचा प्रसार’, असे सांगतो ‘सनातन प्रभात’ ।
प्र – प्रसन्न वदनाने जनजागृती करतो ‘सनातन प्रभात’ ।
भा – भास्करासम (सूर्यासम) तेज जयाचे, तो ‘सनातन प्रभात’ ।
त – तारून नेणार सार्या जगाला असा हा ‘सनातन प्रभात’ ।
– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), जळगाव (११.९.२०२०)