पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते
ब्रिटनमध्ये हिंदूंकडून पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन !
पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात विदेशात शेकडोंच्या संख्येने हिंदू आंदोलन करतात, हे त्यांच्यासाठी काहीही न करणार्या भारतातील जन्महिंदूंसाठी लज्जास्पद आहे ! पाकमधील धर्मबांधवांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार्या विदेशातील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदूंनी बोध घ्यावा ! – संपादक
लंडन – पाकिस्तान जगभरातील आतंकवाद्यांचे मुख्य केंद्र बनले आहे. तो आतंकवाद्यांना केवळ पाठींबाच देत नाही, तर त्यांची निर्मितीही करतो आणि त्यांना शेजारी राष्ट्रांमध्येही पाठवतो. त्यामुळे आता जगाने पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ आणि त्याच्या सैन्याला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी पाकमधील कराचीचे माजी महापौर तथा मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांनी केली. (जे पाकमध्ये जन्मलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्याला कळते, ते संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनांना का कळत नाही ? जागतिक शांततेसाठी पाकवर निर्बंध घालून त्याला ‘आतंकवादी देश’ घोषित करणे अत्यावश्यक आहे ! – संपादक) आरिफ अजाकिया यांनी वारंवार पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. त्यांना पाकमध्ये विरोध होऊ लागल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात १५ ऑगस्ट या दिवशी तेथे वास्तव्य करणार्या हिंदूंनी लंडनस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या समोर आंदोलन केले. या आंदोलनाला अजाकिया यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना संबोधित करतांना अजाकिया यांनी वरील वक्तव्य केले.
अजाकिया म्हणाले की,
१. पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र मुसलमानेतर मुलींचे बळजोरीने धर्मांतर केले जाते.
२. पाकमधील हिंदु, शीख, ख्रिस्ती, पारसी लोक मुली जन्माला घालण्यास घाबरतात. त्यांना वाटते की, त्यांना मुलगी झालीच आणि ती १२-१३ वर्षांची झाल्यावर तिचे धर्मांधांकडून अपहरण केले जाईल.
Listen what the ex-mayor of Jamshed town, Karachi @arifaajakia has to say from London.
Reason behind the ongoing havoc in #Afghanistan #Pakistan should be declared a terrorist state !!! pic.twitter.com/meJn8EFy36
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2021
३. आता पाकिस्तान मनुष्यासाठी रहाण्यास लायक राहिला नाही. तो एक आतंकवादी देश बनला आहे. तालिबान्यांनी काबुल कह्यात घेतले, तेव्हापासून पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
४. पाक आणि भारत यांची एकाच वेळी निर्मिती झाली. असे असतांना कधी भारतियांनी पाकप्रमाणे आतंकवादी कृत्ये केल्याचे आपण पाहिले आहे का ? भारतियांचे आणि आमचे गुणसूत्र एकच आहेत; परंतु धर्मांतर झाल्यानंतर आम्ही (पाकमधील धर्मांध) मनुष्य न रहाता पशू का बनलो ?
५. जेव्हा आपण एखादी खाण्याचा पदार्थ खरेदी करतो, तेव्हा त्याच्यावर एक्सपायरी डेट (कालबाह्य होण्याचा दिनांक) पडताळतो. पाकिस्तानची ‘एक्सपायरी डेट’ निघून गेली आहे. खाद्यपदार्थाची ‘एक्सपायरी डेट’ संपल्यावर त्यात कीडे निर्माण होतात, तसेच पाकिस्तानचे झाले आहे.