तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणार्यांना अटक
कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाची वाहतूक होतेच कशी ? ‘कसायांना कायद्याची भीती नाही कि पोलिसांकडून कायद्याची प्रामाणिकपणे कार्यवाही होत नाही ?’ याचा शोध राज्यातील भाजप सरकारने घेतला पाहिजे ! – संपादक
तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – तालुक्याच्या अगुंबे घाटाच्या फॉरेस्ट गेट जवळ ४०० किलो गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी अडवूून इरफान आणि महंमद या धर्मांधांना अटक केली. हे दोघे मंगळुरू येथील रहाणारे आहेत. हे दोन्ही धर्मांध वाहनाच्या दर्शनी भागात भाजीची पोती ठेवत आणि त्याच्या मागे गोमांस ठेवून त्याची वाहतूक करत होते. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. (जी माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळते, तरी सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाहीत ? कि ते जाणीवपूर्वक त्याकडे आर्थिक कारणासाठी दुर्लक्ष करतात ? याची चौकशी राज्यातील भाजप सरकारने केली पाहिजे ! – संपादक)