मुनव्वर राणा यांच्याकडून महर्षि वाल्मीकि यांची तालिबानशी तुलना !

  • उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने तात्काळ या अवमानावरून मुनव्वर राणा यांना अटक करून कारागृहात टाकावे आणि त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • मुनव्वर राणा यांचे विधान एखाद्या तालिबान्यापेक्षा कमी नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! 

   मुनव्वर राणा

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – तालिबान आतंकवादी आहेत; मात्र तितके नाही, जितके रामायण लिहिणारे वाल्मीकि होते, असे विधान मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले आहे.

१. मुनव्वर राणा पुढे म्हणाले की, जर वाल्मीकी रामायण लिहितो, तर तो देवता होऊन जातो; मात्र त्यापूर्वी तो डाकू होता, त्याचे तुम्ही काय करणार ? प्रत्येक व्यक्तीची भूमिका आणि चरित्र पालटत असते, असे सांगत मुनव्वर राणा यांनी तालिबानचे समर्थन केले.

२. मुलाखत घेणार्‍या पत्रकाराने मुनव्वर राणा यांना याविषयी म्हटले, ‘तुम्ही वाल्मीकि यांची तुलना तालिबानशी करू नये.’ त्यावर राणा म्हणाले की, तुमच्या धर्मामध्ये कुणालाही देव ठरवले जाते; (राणा यांच्या धर्मांत देव म्हणावे असे कुणी तरी आहे का ? बहुतेक जिहादी, आतंकवादी, वासनांध, कुख्यात गुंड, बलात्कारी असेच निपजतात ! – संपादक) मात्र वाल्मीकि लेखक होते. हे मान्य की त्यांनी मोठे कार्य केले. त्यांनी रामायण लिहिले.