पंजाबमधील धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्याचा खलिस्तानी आतंकवाद्यांचा कट
आय.एस्.आय.चे साहाय्य
अमृतसर (पंजाब) – पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलला हाताशी धरून पंजाबमधील धार्मिक स्थळे आणि धार्मिक नेते यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचला आहे, अशी माहिती पकडण्यात आलेले खलिस्तानी आतंकवादी सॅमी आणि अमृतपाल सिंह या दोघांनी पोलिसांच्या चौकशीत दिली. या आतंकवाद्यांचे साथीदार अमृतसर, होशियारपूर, जालंधर आणि लुधियाना या पंजाबमधील शहरांमध्ये लपून बसले आहेत. (जिहादी आतंकवाद्यांनंतर आता खलिस्तानीही हिंदूंची धार्मिक स्थळे आणि त्यांचे नेते यांनाच लक्ष्य करणार, हे लक्षात घ्या ! – संपादक)