उत्तरप्रदेशातील देवबंद गावात एटीएसचे कमांडो प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय !
देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश शासनाने देवबंद गावात आतंकवादविरोधी पथकाच्या कमांडोंना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. देवबंद गावात दार-उल्-उलूम नावाचे इस्लामचे कुख्यात अभ्यासकेंद्र आहे. या केंद्रात कट्टरतावादी आणि धर्मांध बनण्याचे शिक्षण दिले जाते. अनेक वेळा हे केंद्र वादाच्या भोवर्यात सापडले आहे. येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याला काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. राज्यातील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शाहनवाज आलम म्हणाले, ‘‘हा निर्णय देवबंदला अपकीर्त करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांचे पूर्वज इंग्रजांची क्षमा मागत होते (हे वाक्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना उद्देशून आहे) आणि काँग्रेसची हेरगिरी करतात, तेच आता अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत’, असा आरोप केला आहे.
UP govt to set up new ATS Commando Centre at Deoband & 4 locations amid ‘Taliban savagery’ https://t.co/1IGjXX8eBv
— Republic (@republic) August 18, 2021
१. आलम म्हणाले की, देवबंदची प्रतिमा बिघडवण्याचा हा प्रयत्न स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि लोक यांचा अवमान आहे. देवबंद येथील मदरशांतील सहस्रो उलेमांनी (उलेमा म्हणजे धर्मज्ञानी. धार्मिक नियमांचे पालन होत आहे ना ? याकडे ते लक्ष ठेवतात.) काँग्रेसच्या समवेत इंग्रजांचा विरोध केला होता आणि हौतात्म्य पत्करले होते. (आताची स्थिती आणि त्या वेळची स्थिती यात जमीन अस्मानाचा भेद आहे, याकडे आलम जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ! – संपादक)
देवबंद में ATS कमांडो सेंटर के विरोध में कॉन्ग्रेस, नेता शाहनवाज आलम ने कहा – ‘बदनाम करने की साजिश’#deoband #YogiAdityanathhttps://t.co/8BTRJXXdmL
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 19, 2021
२. आलम पुढे म्हणाले की, वर्ष २००७ मध्ये मालेगाव, समझौता एक्सप्रेस, मक्का मशीद आणि अजमेर येथील दर्गा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमण, तसेच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हत्येचा कट रचण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संघाच्या लोकांनी ज्यांची नावे घेतली होती, आज ते राज्य चालवत आहेत. (ज्यांनी वर्ष १९८४ मध्ये देहलीमध्ये साडेतीन सहस्र शिखांचे हत्याकांड केले, ती काँग्रेस त्यानंतरही अनेक वर्षे देशावर आणि आता अनेक राज्यांवर राज्य करत आहे. या हत्याकांडासाठी १-२ काँग्रेसवाले वगळता अन्यांना शिक्षा झाली आहे का ? ‘मोठे वृक्ष पडल्यावर धरणी हालणारच’ असे म्हणत या हत्याकांडाचे समर्थन करणारे तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी आलम का बोलत नाहीत ? – संपादक)