कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथील कोरोना उपचार केंद्रातून १४ रुग्णांचे पलायन !
कोरोना उपचार केंद्राच्या व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार ! उपचार केंद्रातून रुग्ण पळून जाणे गंभीर आहे. या रुग्णांमुळे अन्य नागरिक कोरोनाबाधित झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) – येथील श्रीराम मंगल कार्यालयातील कोरोना उपचार केंद्रातून १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेले आहेत. याविषयी प्राथमिक आरोग्यसेवक दत्तात्रय मल्लिकार्जुन कांबळे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत पळून गेलेल्या रुग्णांविरोधात तक्रार प्रविष्ट केली असून कुर्डूवाडी पोलिसांनी या १४ रुग्णांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कुर्डूवाडीलगत असलेले हे शासकीय कोरोना उपचार केंद्र १०० रुग्ण क्षमतेचे आहे. सध्या येथे ९८ रुग्ण उपचार घेत आहेत.