खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित !
सातारा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर गत ४ दिवसांपासून उपचार चालू आहेत. राजमाता कल्पनाराजे भोसले यांना रुग्णालयात भरती केल्याचे समजताच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उदयनराजे देहली येथून अधिवेशन सोडून पुणे येथे आले होते. मातोश्रींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला. यानंतर काही लक्षणे आढळून आल्यावर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. आता दोघांची प्रकृती चांगली आहे, असे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.