सातारा वनविभागाच्या कारवाईमध्ये वाघासह बिबट्याची ११ नखे हस्तगत !
कराड, १९ ऑगस्ट (वार्ता.) – शहरामध्ये वाघनखे विक्री करणार्या दिनेश बाबूलाल रावल आणि अनुप अरुण रेवणकर या दोघांना वनविभागाने आज अटक केली. त्यांच्याकडून वाघासह बिबट्याची ११ नखे हस्तगत करण्यात आली आहेत. वनविभागाच्या अधिकार्यांनी कृष्णा नाका येथे सापळा रचला. या दोघांचा आंतरराज्य टोळींशी संबंध असल्याचा संशय वन्यजीव अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
वनविभाग दोघांची कसून चौकशी करत असून वाघनखांना मोठे बाजारमूल्य आहे. दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.