६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती गलांडे (वय ५९ वर्षे) यांच्या नावाचा त्यांच्या आईने उलगडलेला अर्थ !
४.८.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती गलांडे यांचा ५९ वा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्यांच्या आईने त्यांच्या नावाचा उलगडलेला अर्थ पुढे दिला आहे.
भा – भाव ठेवूनी सदैव मनी ।
र – रत असे सदा गुरुसेवेत ।
ती – तिची अगाध श्रद्धा गुरूंप्रती ।
ग – गवसला उद्देश नरजन्माचा ।
लां – लाभले जीवन वैकुंठाचे (टीप १) ।
डे – ओलांडे भवसागर हा, बैसूनी प्रक्रियेच्या (टीप २) नावेत ।
नावाडी असे प्रत्यक्ष श्रीविष्णु (टीप ३), घेऊन जाई मोक्षाप्रत ।।
टीप १ – रामनाथी आश्रमात रहाण्याचे
टीप २ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले’
– सौ. सुलोचना जाधव (आई, वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.८.२०२१)