सामाजिक अंतराचा नियम पाळून मंदिरे उघडण्यास काय हरकत ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
पंढरपूर, १८ ऑगस्ट – जेवढी गर्दी मद्यालये आणि ‘मॉल’मध्ये होते, त्यापेक्षा अल्प गर्दी मंदिरांत होते. हार-फुले विक्रेत्यांपासून ते मंदिरातील पुजार्यांपर्यंत अशा अनेक गरीब आणि गरजू लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडणे आवश्यक आहे. सामाजिक अंतराचा नियम पाळून मंदिर उघडण्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. माजी आमदार सुधारपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दळणवळण बंदी सदृश्य परिस्थिती आहे. आता काही प्रमाणात दळणवळण बंदी शिथील करण्यात आली आहे. अन्य अनेक गोष्टी सरकारने चालू केल्या असून केवळ धार्मिक स्थळे आणि मंदिरे बंद ठेवली आहेत. एकीकडे सरकार मद्यालये चालू करते, तर दुसरीकडे मंदिरे बंद ठेवते. मंदिरे बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे.’’