सांगली महापालिकेच्या वतीने वि.स. खांडेकर वाचनालयाचे उद्घाटन
सांगली, १८ ऑगस्ट – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने नूतनीकरण केलेले वि.स. खांडेकर वाचनालय आणि अभ्यासिका यांचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांसह अन्य उपस्थित होते.