चिमूर (गडचिरोली) येथे काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की !
निष्कारण धक्काबुक्की करणारे पक्ष जनहित काय साधणार ?
चिमूर (गडचिरोली) – क्रांती शहीद स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित केलेला कार्यक्रम चालू असतांना तेथे भाजपच्या वतीने काढण्यात आलेली वाहनफेरी आली. या वेळी भाजप आणि काँग्रेस पक्षांचे नेते अन् कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही वेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हुतात्मा स्मारकापुढेच भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे कार्यालय आहे. राज्याचे बहुजन कल्याण तथा पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांचे मनोगत चालू असतांना भाजपच्या वतीने काढण्यात आलेली वाहनफेरी हुतात्मा स्मारक येथे पोचली. तेथे काँग्रेस आणि भाजप पक्षांचे नेते अन् कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यात धक्काबुक्की झाली; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याविषयी कुणाचीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.