पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. वृंदा बेंगरूट यांनी प्रसंगावधान राखून दंगा करणार्या एका मतीमंद महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले !
पुणे, १८ ऑगस्ट (वार्ता.) – येथील सनातनच्या साधिका सौ. वृंदा बेंगरूट यांनी प्रसंगावधान राखले. त्यांच्या आंबेगाव बु. येथील लेक वूड सोसायटीमध्ये एक मतिमंद महिला घुसून तेथील लहान मुलांना मारणे, वाहनांची तोडफोड करणे, तेथील महिलांच्या अंगावर धावून जाणे अशी कृत्ये करत होती. तिला त्यापासून रोखले आणि तिला पकडून पोलिसांना स्वाधीन केले.
१५ ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालू असतांना सोसायटीच्या आवारात एक अर्धनग्न मतीमंद महिला शिरली. महिला मतीमंद असल्याने कुणीही तिला पकडू शकत नव्हते आणि सर्वजण भीतीने दूर पळत होते. कोणतीही हानी करण्याच्या आधी सौ. वृंदा बेंगरूट यांनी त्या मतीमंद महिलेच्या हाताला धरून पकडले आणि तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी सौ. वृंदा यांचे आभार मानले. सर्व रहिवाशांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रतिदिन प्रसिद्ध होणार्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या बातम्यांमुळे मनात धाडस निर्माण झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळेच देव, देश आणि धर्म यांसाठी कृती करण्यास प्रवृत्त होता आले’, अशी प्रतिक्रिया सौ. वृंदा बेंगरूट यांनी व्यक्त केली.