‘वसुधा फाऊंडेशन’ आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्याचे वाटप
सांगली, १८ ऑगस्ट (वार्ता.) – वसुधा फाऊंडेशन आणि शिवसेना यांच्या वतीने कवलापूर (जिल्हा सांगली) येथील स्व. सौ. मिनाताई ठाकरे कन्या प्रशाळा येथील विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हासंघटक दिगंबर जाधव, शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे, वसुधा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बुर्ले यांसह अन्य उपस्थित होते.