बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !
|
ढाका (बांगलादेश) – अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार हे जनतेचे सरकार आहे. (तालिबान्यांच्या भीतीमुळे तेथील लोक अफगाणिस्तानातून पळ काढत आहेत, असे चित्र आहे. असे असतांना ‘ते जनतेचे सरकार आहे’, असे म्हणणे हास्यास्पद आहे ! – संपादक) त्यामुळे बांगलादेश तालिबान सरकारचा स्वीकार करील, असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे.
Afghanistan crises : बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन https://t.co/X6UNbytKl2
— Lokmat (@MiLOKMAT) August 17, 2021
मोमेन पुढे म्हणाले की, नवीन सरकार कुणाचे बनते, याने आम्हाला फरक पडत नाही. जर तालिबानच सरकार बनवत असेल, तर आमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे. बांगलादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तालिबानचेही समर्थन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. अफगाणिस्तानचा विकास व्हावा, हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही याकडे मित्रत्वाच्या भावनेतून पहातो.