कोल्हापूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे सातही रुग्ण पूर्णत: बरे झाले ! – डॉ. योगेश साळे, आरोग्याधिकारी
कोल्हापूर, १७ ऑगस्ट – कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना व्हेरियंटमधील डेल्टा प्लसचे सातही रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. हे रुग्ण जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढळले होते. कालपरत्वे विषाणूच्या जनुकीय संरचनेत पालट होत असतात. त्याला आपण म्युटेशन म्हणतो. कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत पालट होऊन डेल्टा प्लस निर्माण झाला आहे. यात कोरोनाप्रमाणेच लक्षणे आढळतात. डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या रहिवास परिसरात सध्या एकाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.