रुग्णालयातील एका सुरक्षा अधिकार्‍याने साधक साधना करत असल्याचे ओळखणे आणि ‘भक्ती वाढवणे’, हाच कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्याचा उपाय, असे साधकाला सांगणे.

श्री. दत्तात्रय पिसे

‘माझे वडील रुग्णाईत असल्याने मी मुंबईच्या टाटा रुग्णालयात गेलो होतो. ‘रुग्णालय म्हणजे आश्रमच असून तेथील सर्व आधुनिक वैद्य हे माझे सहसाधकच आहेत’, असा भाव मी ठेवला होता.

एक सुरक्षा अधिकारी फिरत असतांना माझ्याजवळ येऊन मला म्हणाले, ‘‘तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रातील आहात. तुम्ही सर्व जण महान आहात. तुम्हाला बघितल्यावरच तुमचा आध्यात्मिक अधिकार मी ओळखला. ‘भक्ती वाढवणे’, हाच कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्याचा उपाय आहे. ‘भक्ती वाढवा’, असेही लोक सांगत नाहीत. ते तुम्ही सांगू शकता. भक्ती वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा; कारण तुम्ही अध्यात्म जाणता. एका दृष्टीतच मी तुमचे श्रेष्ठत्व ओळखले आहे. मी खाकी गणवेशात असल्याने अधिक बोलू शकत नाही, तरी ‘तुम्हीच लोकांना सत्य सांगा’, अशी माझी विनंती आहे.’’

– श्री. दत्तात्रय पिसे, सोलापूर (९.४.२०२०)